Jiten Vaidya

← सर्व लिखाण

ई ई कमिंग्स या कवीची एका पातळीवर चावट आणि दुसऱ्या पातळीवर नवीन भावनिक गुंतवणूक होत असतानाचा हळवेपणा आणि दुखरेपणा याबद्दल असलेली "मे आय फील? सेड ही" ही कविता मला फार आवडते.

या कवितेचे जरासं मुक्त भाषांतर या पोस्टमध्ये टाकत आहे. या कवितेला मी "पकडू? म्हणाला तो" हे नाव दिले आहे. पण या नावाने कवितेच्या दुसऱ्या अर्थावर थोडा अन्याय होतो. तुम्हाला कोणाला दुसरे काही सुचले तर सांगा.

पोस्ट फक्त मराठीत लिहिली तर ती जास्त जणांना पोहोचते का हे पाहण्यासाठी मूळ कविता पोस्टमध्ये न देता पहिल्या कमेंटमध्ये देत आहे.

पकडू? म्हणाला तो
ओरडेन! म्हणाली ती
एकदाच? म्हणाला तो
मज्जा! म्हणाली ती

हात लावू, म्हणाला तो
कुठे? म्हणाली ती
सगळीकडे! म्हणाला तो
चालेल की, म्हणाली ती

चल जाऊ, म्हणाला तो
फार पुढे नको, म्हणाली ती
पुढे म्हणजे कुठे? म्हणाला तो
तू आहेस तिथे, म्हणाली ती

राहू का इथेच, म्हणाला तो
कसं? म्हणाली ती
असं, म्हणाला तो
जर मुका घेतलास तर, म्हणाली ती

मी हलू? म्हणाला तो
हे प्रेम आहे का? म्हणाली ती
जर तू हो म्हणालीस तर, म्हणाला तो
पण तू मारतोयस मला, म्हणाली ती

पण हे तर आयुष्य आहे, म्हणाला तो
पण तुझी बायको, म्हणाली ती
आत्ता! म्हणाला तो
दुखतय! म्हणाली ती

किती छान, म्हणाला तो
आता थांबू नको, म्हणाली ती
नाही नाही, म्हणाला तो
जरा हळू रे, म्हणाली ती

पोचलो!/लीस? म्हणाला तो
अम, म्हणाली ती
तू किती छान आहेस, म्हणाला तो
तू फक्त माझाच! म्हणाली ती

लिंक:

फेसबुकवर पूर्वप्रकाशित, ५ ऑगस्ट, २०२५.