Jiten Vaidya

← सर्व लिखाण

अठ्ठावीस फेब्रुवारीला शजराह तय्येबे शाळेत झालेल्या स्फोटात १७५ मुली मारल्या गेल्या. याला अमेरिका जबाबदार आहे का इस्रायल असा प्रश्न होता आणि इराणच याला जबाबदार आहे असा उलटा कांगावा अमेरिकन राजकारण्यांनी केला होता.

न्यू यॉर्क टाईम्स ने गेले काही दिवस हा मुद्दा लावून धरला होता. आणि आता अमेरिकन सैन्याने केलेल्या अंतर्गत चौकशीनुसार चूक अमेरिकेची होती हे अमेरिकन सैन्याने मान्य केले आहे. सध्या सत्तेत असलेल्या अमेरिकन राजकारण्यांना खऱ्याखोट्याचा अजिबातच विधिनिषेध उरलेला नाही. परंतु अमेरिकेतली वर्तमानपत्रे आणि सैन्यातले काही भाग यांनी हा विधिनिषेध सोडलेला नाही हे पाहून थोडे समाधान वाटले.

मूळ लिंक: https://www.nytimes.com/2026/03/11/us/politics/iran-school-missile-strike.html?unlocked_article_code=1.SVA.W7Fu.-Hp62PMEw62Q&smid=url-share

फेसबुकवर पूर्वप्रकाशित, ११ मार्च, २०२६.