Jiten Vaidya

← सर्व लिखाण

"रावभाजीची पावभाजी" मी पहिल्यांदा वाचली तेव्हा अक्षरशः मला आनंदाच्या गुदगुल्या होत होत्या. सुंदर कथा वाचल्याचा अनुभव आणि या तोलामोलाची कथा भासच्या नव्या अंकात असणार अशा दोन्ही बाबींचा तो आनंद होता.

गोष्टीचा प्लॉट, तिची बांधणी, तिची शैली या सगळ्यावर बरच काही लिहिता येईल पण मला त्यातली पात्र आणि त्यांचा जीवनाकडे बघण्याचा एकंदरीत दृष्टिकोन फारच आवडला. कथानायकाला आई बापाचं प्रेम मिळालेलं नाही पण एका लहान पोराचं आयुष्य जितकं बरं करता येईल तितकं करण्यासाठी तो स्वतःचं आयुष्य पणाला लावतो. सगळ्याकडे रोखठोक नजरेने बघणारी ही कथा तरीही फारच सहृदय आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे ती माझ्या मते तरी थोर कथांच्या रांगेत जाऊन बसते.

रेखाटनं श्रीबांची.

आदू बाळ आणि श्री बा - आमचा मुजरा घ्या.

फेसबुकवर पूर्वप्रकाशित, १९ ऑक्टोबर, २०२५.