Jiten Vaidya

← सर्व लिखाण

मुग्धा धनंजय यांच्या वॉलवर त्यांनी केलेले बालकवींच्या पारवा कवितेचे भाषांतर वाचले, आणि आपणही करून पहावे अशी सुरसुरी आली. त्यांच्या पोस्टवर कमेंट म्हणून लिहिले होते ते इथेही टाकत आहे.

मूळचे कडवे आणि त्याखाली त्या कडव्याचे भाषांतर.

पारवा - बालकवी

भिंत खचली कलथून खांब गेला
जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाला
तिच्या कौलारी बसुनि पारवा तो
खिन्न नीरस एकांतगीत गातो

In the ruins of a caravanserai
collapsed wall, upturned pillar
A lone dove sits on the shingled roof
and sings a drab sad song
of loneliness

सूर्य मध्यान्ही उभा राहे
घार मंडळ त्याभवती घालताहे
पक्षी पानांच्या शांत सावल्यांत
सुखे साखरझोपेत पेंगतात.

At high noon
The kites slowly circle the Sun
In the dim shadows of green leaves
Birds rest in sweet slumber

तुला नाही परि हौस उडायाची
गोड हिरव्या झुबक्यात दडायाची
उष्ण झळ्या बाहेर तापतात
गीतनिद्रा तव आंत अखंडित

The free flight does not call you
Nor the green refuge of leaves
In the hot blasts without
Your sleepsong flows unbroken within

चित्त किंवा तव कोवळ्या विखारे
दुखतेखुपते का सांग सांग बा रे
तुला काही जगतात नको मान
गोड गावे मग भान हे कुठून

What grief pierces your tender heart
Speak, do speak your anguish
You seek no accolades
Then whence this sweetness in song?

झोप सौख्यानंदात मानवाची
पुरी क्षणही कोठून टिकायाची
दुःखनिद्रे निद्रिस्त बुध्दराज
करूणगीते घुमवीत जगी आज.

The humankind is doomed
To but a blink of contended sleep
The world rings with the songs of sorrow
That the Buddha sings in his sleep of sadness

दुःखनिद्रा ती आज तुला लागे
तुझे जगही निद्रिस्त तुझ्या संगे
फिरे माझ्या जगतात उष्ण वारे
तुला त्याचे भानही नसे बा रे.

As you rest in that sad slumber
So does your world with you
As searing winds scorch my world
You sleep on unaware

फेसबुकवर पूर्वप्रकाशित, ११ फेब्रुवारी, २०२६.