मैत्रिणीला लिहिलेल्या पत्रातून:
"तुला H is for Hawk या पुस्तकाबद्दल सांगितले आहे का मी? हेलन मकडोनालड नावाच्या बाईने लिहिलेल. बरचसं आत्मचरित्रात्मक. अतिशय उत्कट, छोटसं पुस्तक. वडलांचा मृत्यू, त्या दुःखातून आलेल डिप्रेशन, वडलांच्या आठवणी आणि मुख्य म्हणजे आपल्याकडे किंवा आखातात जसे ससाणे ट्रेन करून त्यांना शिकार करायचा शिकवतात ना, तसं एका Goshawk ला पाळणं, तिच्याशी मैत्री करणं, तिची काळजी घेणं (आणि तिच्या बद्दल काळजी करणं), आणि हळूहळू तिचा विश्वास प्राप्त करणं. तिला एकटी सोडली तर ती परत येईल का याबद्दल आधी अतिशय भीती वाटणं पण हळूहळू स्वतःवर आणि तिच्यावरचा विश्वास वाढत जाऊन तिला एकटी सोडून शिकार करू देणं. आणि हे करताना हळूहळू वडिलांच्या दुःखातून बाहेर येणं. असं ते पुस्तक.
पण आत्ता तुला याबद्दल लिहीत आहे कारण त्या पुस्तकावर आधारित H is for Hawk याच नावाचा अतिशय सुरेख सिनेमा विमान प्रवासात बघितला.
थोडीशी eccentric, उत्कट स्वभावाची अशी ती मुलगी. आणि कदाचित इतर लोकांशी मैत्री कशी करायची हे फारसं कळत नसल्यामुळे relaxed, गोड आणि स्वतःही थोड्या eccentric असलेल्या बापाबरोबरचं उत्कट नातं. हे सगळं नायिकेचं काम करणाऱ्या नटीने (Claire Foy) फारच सुरेख रंगवलं आहे. आणि बाप मेल्यानंतर तिचं damaged, fragile असणंही.
आणि या वेड्या कोकराला कुणीतरी बघायला पाहिजे अशा भावनेतून अगदी सहजपणे तिची काळजी घेणारी तिची मैत्रीण. आणि मग ती Goshawk. तिचं मेबल हे नाव ठेवणं. तिचं ट्रेनिंग. त्या दोघींचं नातं त्या Goshawk ला जराही anthropomorphise न करता इतक्या सेन्सिटिव्हपणे रेखाटलं आहे की थक्क व्हायला होतं. फारच आवडला मला हा सिनेमा."
जमलं तर नक्की पहा!
फेसबुकवर पूर्वप्रकाशित, ६ जून, २०२६.