Jiten Vaidya

← सर्व लिखाण

मी "जितेन वैद्य" हा प्रोफाइल मराठी मध्ये लिहिण्यासाठी काही वर्षांपूर्वी माझ्या मूळ "Jiten Vaidya" या प्रोफाइल खाली तयार केला.

या प्रोफाइल मध्ये मी मराठीत लिहितो आणि भास बद्दल लिहितो. मला ज्यांचं मराठी लिहिणं आवडतं त्या सगळ्यांना मी या प्रोफाइल वरून फ्रेंड रिक्वेस्ट टाकल्या आणि त्यांच्याशी मैत्री केली. फेसबुक अधून मधून People You May Know खाली जी लोक दाखवत असे त्यांनाही फ्रेंड रिक्वेस्ट टाकल्या. मला आलेल्या जवळजवळ सगळ्या (लॉक प्रोफाइल सोडून) फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट केल्या आणि अशा रीतीने या प्रोफाइलला जवळ जवळ अडीच हजार फ्रेण्ड्स आहेत.

आता मला फेसबुक सांगत आहे की ते अशा प्रकारचे सेकंडरी प्रोफाइल बंद करणार आहे आणि हा प्रोफाइल १४ डिसेंबरला डिलीट केला जाईल.

इथल्या सगळ्या मित्रांना माझ्या Jiten Vaidya प्रोफाईल मध्ये मित्र म्हणून घेणे असा एक पर्याय आहे पण मला तो योग्य वाटत नाही कारण त्या प्रोफाइल मध्ये माझे शाळेतले कॉलेजमधले मित्र, निरनिराळ्या कामाच्या जागी झालेले मित्र, नातेवाईक, शेजारी असे सर्व आहेत. मी अमेरिकेत रहात असल्यामुळे अर्ध्याहून जास्त मित्र अमेरिकन आहेत. त्यांना मराठी येतही नाही.

यावर पर्याय म्हणून मी "जितेन वैद्य" असे एक फेसबुक पेज तयार करत आहे आणि त्या पेजवर मी मराठी लिहत राहणार आहे. कृपया हे पेज फॉलो करा कारण १४ डिसेंबर पासून माझा प्रोफाइल अदृश्य होणार आहे :)

ही नव्या पेजची लिंक:

https://www.facebook.com/profile.php?id=61596341567236

मूळ लिंक: https://www.facebook.com/profile.php?id=61596341567236

फेसबुकवर पूर्वप्रकाशित, १९ नोव्हेंबर, २०२६.