Jiten Vaidya

← सर्व लिखाण

आज संध्याकाळी "अलीगढ" हा पिक्चर पाहिला. शून्य भाषणबाजी, अप्रतिम cinemetography आणि त्रिमित पात्रे, विशेषतः मनोज वाजपेयीने साकार केलेले प्रोफेसर सिरस यांचे पात्र. विद्वत्तेचा, स्वतः प्रोफेसर असल्याचा, कवी असल्याचा आत्मविश्वास, पण आधुनिक जगाने आपल्याला थोडे मागे टाकले आहे याची जाणीव. एकंदरीत मृदुपणाने स्वतच्या गे असण्याचा, किंबहुना स्वतःचाच, केलेला स्वीकार. आणि एक मूलभूत मराठीपणा हे सगळं (अर्थातच लेखक आणि दिग्दर्शक यांच्याबरोबर) मनोज वाजपेयीने इतक्या प्रभावीपणे साकार केलं आहे की थक्क व्हायला होतं. तसेच राजकुमार राव यानी साकारलेले दीपूचे पात्र. त्याच idealism, एक इझी सेन्स ऑफ privilege, अंगभूत न्याय अन्यायाची चाड आणि कोवळेपणा. मनोज वाजपेयी आणि राजकुमार राव एकत्र पडद्यावर असताना काही दृश्ये इतक्या कमी शब्दात इतकं काही सांगून जातात की स्तिमित व्हायला होतं. भरून येतं.

सगळया पिक्चरलाच एक "असं झालं, असं होतं" असा एक मॅटर ऑफ फॅक्ट फील आहे. आणि सगळ्या supporting ॲक्टरस / कॅरेक्टर्सच्या अभिनयातून, मोजक्याच प्रसंगांमध्ये वापरलेल्या बॅकग्राऊंड म्युझिकमधून आणि cinematography मधूनही तो व्यक्त होतो.

बऱ्याच दिवसांनी ज्यात हरवून जावं असा पिक्चर बघायला मिळाल्याच समाधान मिळालं.

फेसबुकवर पूर्वप्रकाशित, ७ डिसेंबर, २०२४.