Jiten Vaidya

← सर्व लिखाण

भास बद्दल बोलताना Vishal Rathod मागच्या वर्षी म्हणाला होता:

"आताही कागदोपत्री जरी माझं वय वाढलं असलं तरी मला फॅन्टसी, साहस, नवल, रहस्य, गूढ, भय अशा पिच्चर, पुस्तकांचं अजूनही तितकंच आकर्षण आहे..."

अगदी याच भावना भास प्रकल्प चालू करताना आणि भास वर काम करताना आमच्या मनात होत्या.

आणि मागच्या वर्षी विशालने एक छान कल्पना आम्हाला दिली होती:

"डिझाईन, रंग आणि एकूण Aesthetics बद्दल मला काही समजत नाही हे गृहीत धरूनही ॲजे वाचक म्हणून जाता जाता रंगाबद्दल एक गोष्ट सुचवायलाआवडेल. या मुखपृष्ठावर निळ्या (की जांभळ्या?) रंगाचा वापर डोळ्यात भरतो. तसा पुढच्या अंकावर फक्त पिवळा, फक्त लाल, फक्त पांढरा असं काही होत गेलं तर पर्सनली मला संग्रही ठेवायला फार आवडेल."

मेघना, नर्मदा आणि मी आम्हाला तिघांनाही ही सूचना अतिशय आवडली. तर ११२४ हा निळा भास, तर १०२५ हा लाल भास आहे.

काय विचारता? सात वर्षांनी काय करणार? आमचे वाचक काहीतरी नवीन कल्पना सुचवतीलच तोपर्यंत :)

फेसबुकवर पूर्वप्रकाशित, १ नोव्हेंबर, २०२५.