Jiten Vaidya

← सर्व लिखाण

भास ११.२४ मध्ये Tejas Modakने केलेल्या रेखाटनांच्या निमित्ताने त्याची ओळख व्हायच्या आधीच मी त्याच्या कवितांच्या प्रेमात पडलो होतो. पहिल्यांदा भेटलो तेव्हा एका तासाऐवजी चार तास कसे गेले दोघांनाही समजले नाही आणि आपल्याला एक नवा मित्र भेटला याची जाणीव झाली. पुस्तकं, चित्रपट, कविता, आयुष्य या सगळ्याबद्दल त्या दिवशी जो संवाद सुरू झाला तो अजून चालूच आहे.

भास १०.२५ च्या मुखपृष्ठावरचे सुरेख चित्र तेजसचे आहे. आणि पुस्तकाची छपाई कशी होते, चित्रातले रंग छपाई करताना कागदावर कसे उतरतात यावर त्याला आमच्यापेक्षा जास्ती माहिती असल्यामुळे छापखान्यातल्या लोकांशी बोलणे, आम्हाला ते शिकवणे इथपर्यंत सगळे या भाससाठी तेजसने केले.

फोटो मागच्या वर्षात कधीतरी पुण्यात भेटलो होतो तेव्हा घेतलेला आहे.

फेसबुकवर पूर्वप्रकाशित, १ नोव्हेंबर, २०२५.