Jiten Vaidya

← सर्व लिखाण

सानियाचं "प्रवास" हे आत्मचरित्रात्मक लेखांचं पुस्तक वाचत आहे. फारच आवडतं आहे. त्यातला विशेष भावलेला विवेकवादाबद्दलचा हा परिच्छेद:

"आयुष्य पुष्कळ जगून झाल्यानंतर हा विवेकवादाचा प्रवास माझ्या आता नीटपणे लक्षात येतो. कर्मकांडांना तर मी संपूर्ण फाटा दिलाच, काही ठामपणे, क्वचित काही प्रसंगी वादविवाद करून, पण एकंदरीत बुद्धिवादाची, शास्त्रीय मीमांसेची वाट घेतली. त्या वाटेनं मला कधीही दगा दिला नाही. आयुष्यात अडचणींचे आणि अपार दुःखाचे प्रसंग वाट्याला आले, पण विवेकवादाने त्यात मला खंबीर आधार दिला. मानवी दुःखाकडे बघण्याची समज दिली. स्वीकाराची, प्रगल्भतेची दिशा दाखवली. वाटा सोप्या कधीच नसतात, पण आपल्या मनातल्या शास्त्रीय, विश्लेषण करत उत्तरांकडे जाणाऱ्या, प्रेम, करुणा, परस्परसमजुतींना कवेत घेऊन क्षमाशील राहणाऱ्या अवघड प्रदेशाकडे त्या घेऊन जातात. सगळे काही आपल्याला समजलेले आहे असा भ्रम कधीच बाळगला नाही, पण खोट्या, भ्रामक, काल्पनिक समजुतींचा आधार न घेता बळ कसं मिळवायचं हे त्यांनी शिकवत नेलं. हा प्रवास माझ्या घडणीतला फार महत्त्वाचा आहे."

फेसबुकवर पूर्वप्रकाशित, २६ जानेवारी, २०२६.