सानिया नेहमीच आवडती लेखिका होती / आहे. आणि मेघना म्हणते तशीच "स्थलांतर" माझीही आवडती कादंबरी. गेल्या एक दोन वर्षात पुन्हा वाचल्यानंतर आणखीन आणखीनच आवडत गेलेली. फेब्रुवारीच्या सात तारखेला सकाळी दहा वाजता सानिया बरोबर पुस्तक गप्पांचा कार्यक्रम करत आहोत. अवश्य सामील व्हा!
मेघनाच्या पोस्ट मधून:
"स्थलांतरबद्दलच आजचं आकलन सांगणारं एक टिपण आणि तेजस मोडकची काही सुरेख रेखाचित्रं असं घालून तिची इ-प्रत प्रकाशित करतो आहोत. इ-बुक तयार करण्याबद्दल स्वतंत्र लिहिणं होईलच. तूर्तास तेजसच्या चित्रांपैकी एक चित्र तेवढं इथे देतेय. तशीच इ-बुक खरेदी करण्यासाठी लिंकही खाली देतेय."
फेसबुकवर पूर्वप्रकाशित, २९ जानेवारी, २०२६.