बेशिस्तपणे वाचत असलो तरी आपण खूप वाचतो असा एक स्वतःबद्दल सुप्त अहंकार होता, तो अभिषेक धनगर बरोबर बोलून, त्याच्या वाचनाची रुंदी आणि खोली याबद्दल ऐकून, पूर्णपणे नष्ट झाला.
सूशिन लिऊ च्या थ्री बॉडी प्रॉब्लेम या ट्रीलजी मधल्या तीन सायन्स फिक्शन कादंबऱ्या आणि क्लार्कवर्ड साइट वर वाचलेल्या काही नवीन सायन्स फिक्शन शॉर्ट स्टोरीज एवढाच माझ्या चायनीज साहित्याच्या वाचनाचा आवाका. अभिषेक बरोबर बोलताना, अर्थातच, हे अनेक हजार वर्षे जुने असे सिव्हिलायझेशन आहे, आणि त्यात जागतिक दर्जाची अनेक पुस्तके असणार असा साक्षात्कार झाला. अभिषेकने चौदाव्या शतकातल्या All Men Are Brothers या रोचक कादंबरी बद्दल तितकीच रोचक अशी गोष्ट सांगितली. ती कादंबरी आता वाचायलाच लागणार.
एकंदरीतच अभिषेक ने वाचलेली पुस्तके, त्याचा पुस्तक संग्रह, पुस्तक वितरण आणि पुस्तक प्रकाशन याबद्दलचे त्याचे विचार या सगळ्या बद्दल त्याच्याशी गप्पा मारायला फारच मजा आली.
ज्या अस्सलपणे अभिषेक वॉल्डन प्रकाशन आणि वॉल्डन बुक स्टोअर चालवत आहे, त्याला सलाम करावासा वाटला.
ब्लॉगची लिंक कमेंट मध्ये, युट्यूब व्हिडिओ आणि पॉडकास्टची लिंक तिथे मिळेल.
लिंक:
फेसबुकवर पूर्वप्रकाशित, २० एप्रिल, २०२६.