Jiten Vaidya

← सर्व लिखाण

माझ्या एका इकॉनॉमिस्ट मित्राकडून हा फारच इंटरेस्टिंग पेपर नुकताच वाचायला मिळाला. पेपर बऱ्यापैकी टेक्निकल असला तरी त्याचा सारांश आपल्या सगळ्यांनाच समजेल अशा भाषेत मांडलेला आहे.

भारतातल्या सध्याच्या राजवटीत आपली प्रगती झाली का या प्रश्नाचे उत्तर हा पेपर देण्याचा प्रयत्न करतो. या प्रश्नात उत्तरात "प्रगती ही कशाच्या तुलनेत?" हा उपप्रश्नही अध्याहृत असतो. आणि याचे उत्तर या लोकांनी एक फारच सुंदर टेक्निक वापरून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी भारतासारख्याच असणाऱ्या काही अर्थव्यवस्था घेऊन त्याला वेगवेगळे वेटेज देऊन एक इंडेक्स बनवली आहे. सध्याची राजवट यायच्या आधी तीस वर्षे भारताची अर्थव्यवस्था जशी होती त्याच्याशी ही इंडेक्स अगदी बरोबर जुळते. आणि मग गेली बारा वर्ष ही इंडेक्स जर त्याच ट्रेन्डलाईनने पुढे चालवली तर साधारणपणे भारताची अर्थव्यवस्था ही राजवट आली नसती तर या ट्रेन्डलाईन प्रमाणे चालली असती असे म्हणता येते. आणि मग या ट्रेन्डलाईनची या राजवटीत आपल्या अर्थव्यवस्थेचे काय झाले आहे याच्या प्रत्यक्ष आकड्यांशी तुलना करता येते.

आणि त्यांचे निष्कर्ष सोप्या प्रकारे मांडण्यासाठी त्यांनी एक इंटरेस्टिंग ग्राफ तयार केला आहे. एका अक्षावर प्रशासनाचे कौशल्य (आणि लोकशाही मूल्ये) तर दुसऱ्या अक्षावर आर्थिक वाढ. त्यांचे निष्कर्ष न सांगता मी तो ग्राफ इथे फोटो म्हणून टाकला आहे. पेपरचे निष्कर्ष खरोखर सोप्या शब्दात मांडले आहेत. नक्की वाचा. लिंक पहिल्या कॉमेंट मध्ये.

फेसबुकवर पूर्वप्रकाशित, १६ ऑगस्ट, २०२६.