विद्यानंद बापटांची भाषा ऐकून मला लिबर्टेरियन लोकांची आठवण येते. शस्त्रांबद्दल किंवा शस्त्रांच्या वापराबद्दल किंवा मोनोपॉली ऑफ व्हायोलन्स बाय द स्टेट याबद्दल बापट वापरत असलेले बरेचसे शब्द आणि बऱ्याचशा संकल्पना लिबर्टेरियन लोक वापरतात. हिंसेबद्दल बोलताना जो कडवेपणा बापटांच्या रिल्स मध्ये मला दिसतो, तोच मला बऱ्याचशा अपक्व लिबर्टेरियन्स मध्येही दिसलेला आहे.
२०१० ते २०१५ च्या दरम्यान मी एका मेलिंग लिस्टवर बऱ्यापैकी एक्टिव्ह होतो. तिथली जवळजवळ सगळी लोकं लिबर्टीरियन होती, फक्त मी आणि चार-पाच लोकं या लिबर्टीरियन लोकांना विरोध करायचो. तेव्हा मला हे सगळे शब्द, संकल्पना - एकंदरीतच लिबर्टेरियन विचारधारा आणि त्यातली अतिसुलभता आणि अपक्वपणा - हे बऱ्यापैकी माहिती झालं. बरच शिकायलाही मिळालं - सतराव्या शतकात जॉन लॉक या ब्रिटिश तत्त्वज्ञाने नागरिक आणि राज्यव्यवस्था यांच्यातील नात्याबद्दल जो विचार मांडला (बापट जे म्हणतात ते बऱ्यापैकी त्यावर आधारीत आहे) तोही मुळातून वाचण्यासारखा आहे.
लिबर्टीरियन लोकांना 'शस्त्र धारण करण्याचा अधिकार' याबद्दल फारच ममत्व वाटतं. 'आत्मसंरक्षणासाठी प्रत्येकाने बंदूक बाळगली पाहिजे' हाच विचार जर तार्किकदृष्ट्या पुढे ताणत नेला, तर मग प्रत्येकाला स्वतःकडे अण्वस्त्र ठेवण्याचाही हक्क मिळायला हवा इथे आपण जाऊन पोचतो :). व्हर्नॉर विन्जी या लेखकाची 'द अनगव्हर्नड' नावाची एक इंटरेस्टिंग सायन्स फिक्शन गोष्ट एक्झाक्टली याच बद्दल आहे. वाचायची असेल, तर लिंक कमेंट मध्ये.
मला विद्यानंद बापट यांचं एका गोष्टीसाठी कौतुक वाटतं. ते म्हणजे त्यांच्या धैर्यासाठी. आज समाजात जे चालले आहे त्या अवस्थेत धीराने सर्वांना होणाऱ्या त्रासाबद्दल आवाज उठवण्यासाठी आणि त्यानंतर धिटाईने आपल्या (जरी थोडे भाबडे असले तरी) विचारांबद्दल बोलत राहणे यासाठी त्यांनी जे धैर्य दाखवलं त्यासाठी त्यांना सलाम.
लिंक:
- The Ungoverned by Vernor Vinge https://www.baen.com/Chapters/1416520724/1416520724___4.htm
फेसबुकवर पूर्वप्रकाशित, ५ सप्टेंबर, २०२६.